मूल तालुक्यात सर्व सोयीने युक्त कोरोना केअर सेंटर कार्यान्वीत करावा – काँग्रेसची मागणी

0
52

*तालुक्यात सर्वसोयीने युक्त कोरोना केअर सेंटर कार्यान्वीत करावा- काँग्रेसची मागणी*
मूल (प्रतिनिधी)
तालुक्यात कोरोना बाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असुन तालुक्यातील ४९ ग्राम पंचायती मध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. आजपर्यंत तालुक्यात १२ जणांचा मृत्यु झाला असल्याने तालुक्यातील जनता कोरोना संसर्गामूळे भयभित झाली आहे. तालुक्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने सध्या अस्तीत्वात असलेली तालुक्यातील आरोग्य व्यवस्था तोकडी आहे. त्यामुळे तालुक्याची लोकसंख्या आणि कोरोना बाधीतांची वाढती संस्था लक्षात घेवुन मूल येथे सर्वसोयीने युक्त कोरोना केअर सेंटर मंजुर करून उपलब्ध असलेल्या खाटांच्या संख्येत वाढ करून मिळावी व आँक्सीजन वेंटीलेटर बेडसह पुरेसे वैद्यकीय आधिकारी, नर्स आणि आरोग्य कर्मचारी नियुक्त करून नागरीकांना दिलासा द्यावा. अशी मागणी तालुका काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्ह्याचे पालकमंञी विजय वडेट्टीवार यांचे कडे करण्यात आली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांचे नेतृत्वात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष घनश्याम येनुरकर, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे अध्यक्ष राकेश रत्नावार आणि माळी महासंघाचे तालुकाध्यक्ष गुरू गुरनुले यांनी नुकतीच पालकमंञी विजय वडेट्टीवार यांची भेट घेवुन निवेदन सादर केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here