मूल तालुक्याने गाठला कोरोना बाधीतांचा ९९ चा आकडा

0
77

मूल (प्रतिनिधी)
कोरोना बाधीतांचा आकड्याने अर्धशतक गाठलेल्या मूल तालुक्याने आज ९९ चा पल्ला गाठला असुन मूल तालुक्यात मृतकांची संख्या १२ झाली आहे. अँटीजन तपासणीत १६ तर आरटीपीसीआर तपासणीमध्ये ८३ असे एकुण ९९ कोरोनाबाधीत मूल तालुक्यात सापडल्याने स्थानिक प्रशासना सोबतच नागरीक भयभित झाले आहेत. सावली तालुक्यात आज आरटीपीसीआर तपासणीत ९ जण बाधीत आढळले असुन अँटीजन तपासणीत ८ असे १७ जण बाधीत आढळले आहे. मूल येथील कोरोना चाचणी केंद्रावर १५८ जणांनी आरटीपीसीआर तर ५४ जणांनी अँटीजन असे २१२ जणांनी तपासणी केली असुन मूल तालुक्यात आजपर्यंत १४५६६ जणांनी कोरोनाची तपासणी केली आहे. मूल तालुक्यात असलेल्या २४९ कोरोना अँक्टीव्ह रूग्णापैकी १३१ जण गृह अलगीकरणात तर ११८ जण संस्थात्मक अलगीकरणात आहेत. सावली येथे आज २० जणांनी आरटीपीसीआर तर ८३ जणांनी अँटीजन असे १०३ जणांनी कोरोना तपासणी केली. सावली तालुक्यात आजपर्यंत १०७३३ जणांनी तपासणी केली असुन सावली तालुक्यात कोरोनाच्या १८४ अँक्टीव्ह रूग्णांपैकी ७९ जण गृह अलगीकरणात तर १०५ जण संस्थात्मक अलगीकरणात उपचार घेत आहेत. मूल तालुक्यात आज १३५४ तर सावली तालुक्यात १७१ जणांनी लसीकरणाचा लाभ घेतला. मागील चार दिवसांपासुन मूल तालुक्यात कोरोना बाधीतांचा आकडा झपाट्याने वाढत असल्याने प्रशासन चिंतेत सापडले असुन उद्या पासुन जाहीर केलेला जनता कर्फ्यु अधिक कडक ठेवल्या जाणार असल्याची माहीती आहे. कोरोना बाधीतांचा वाढत्या आकड्यावर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. सध्यास्थितीत मूल येथे २२० खाटांचे १० आँक्सीजन सिलेंडर असलेल्या कोरोना केअर सेंटरची निर्मिती करण्यात आले असुन कोरोना केअर सेंटर आणि गृह अलगीकरणासाठी प्रत्येकी दोन वैद्यकीय पथक परिस्थितीवर लक्ष ठेवुन आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here