मूल तालुक्याने पार केला कोरोना बाधीतांचा शंभराचा आकडा

0
392

मूल (प्रतिनिधी)
आज मूल तालुक्यात कोरोनाचा चांगलाच उद्रेक झाला आहे. अँटीजन तपासणीत ३४ आणि आरटीपीसीआर तपासणीमध्ये ८८ असे एकुण १२२ जण कोरोना बाधीत सापडले असुन मूल शहराचा आकडा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे. तालुक्यात आज १४८ जणांनी आरटीपीसीआर तर ९८ जणांनी अँटीजन असे एकुण २४६ जणांनी तपासणी केली. आजपर्यंत तालुक्यात १४९९७ जणांनी कोरोनाची तपासणी केली आहे. मूल तालुक्यात असलेल्या २८७ कोरोना अँक्टीव्ह रूग्णापैकी १६० जण गृह अलगीकरणात तर १२७ जण संस्थात्मक अलगीकरणात आहेत. कोरोना बाधीतांचा वाढत्या आकड्यावर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. कामाशिवाय घरा बाहेर निघु नका. असे वारंवार सांगत असताना अनेक हवसे-गवसे आणि नवसे कारण नसताना घराबाहेर निघत आहेत. शिवाय लग्न कार्यावर नियंत्रण ठेवा असे सांगुनही अनेकजन शासनाच्या नियमाचे उल्लंघन करून आपली हौस पुर्ण करीत असल्याने दिवसेंदिवस कोरोनाची साखळी तुटण्या ऐवजी पुन्हा वाढत आहे. त्यामुळे उद्या पासुन स्थानिक प्रशासन लाँक डाऊनची कडक अंमलबजावणी करणार आहे. ठोस कारणाशिवाय जो कोणी घराबाहेर फिरतांना आढळल्यास त्याची कोरोना चाचणी करून त्याचे विरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहीती उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी दिली असुन नागरीकांनी कोरोनाचा वाढता आकडा लक्षात घेता साखळी तोडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे.,अशी विनंती केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here