रिकाम्या होणाऱ्या महीला सभागृहात कायम स्वरूपी कोरोना केअर सेंटर सुरू करावे – टहलीयानी यांची मागणी

0
170

मूल (प्रतिनिधी)
महसुल प्रशासनाच्या अधिकारात असलेले चंद्रपूर मार्गावरील महिला सभागृह येथे कायम स्वरूपी कोरोना केअर सेंटर सुरू करून प्रशासनाने नागरीकांना आरोग्याची सेवा पुरवावी. अशी मागणी माजी नगरसेवक मोतीलाल टहलीयानी यांनी केली आहे.
विविध समाजातील महिलांना कार्यक्रमाचे आयोजन करून सुप्त कलागुणांना वाव देण्याचे दृष्टीने शासनाने काही वर्षापूर्वी चंद्रपूर मार्गावर महिला सभागृहाचे बांधकाम पुर्ण केले. महसुल प्रशासनाच्या अधिकारात असलेल्या महिला सभागृहाचे बांधकाम झाल्यानंतर सुरूवातीचे काही वर्षे सदर महिला सभागृह महिला सोबतचं अन्य संस्थानाही वेगवेगळया कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी दिल्या जात होते. कालांतराने मात्र सदर सभागृहाचा उपयोग शासकिय कार्यालयाकरीता करण्यांत येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुक कार्यालयाकरीता वापरण्यांत येत असलेल्या सदर सभागृहात प्रशासकिय भवनाचे बांधकाम पुर्ण होईपर्यंत तहसिल कार्यालय होते. अलीकडे नगर परिषद इमारत निर्माणाधिन असल्याने सदर महीला सभागृहात नगर परिषद कार्यालय सुरू आहे. येत्या काही दिवसात नगर परिषदेच्या निर्माणाधिन असलेल्या नवीन इमारतीचे काम पुर्ण होणार असून भवनात सुरू असलेले नगर परिषद कार्यालय नवीन इमारती मध्यें स्थानांतरीत होणार आहे. त्यामूळे रिकाम्या होणा-या महिला सभागृहात पुन्हा दुसरे कोणतेही शासकीय कार्यालय किंवा उपक्रम सुरू न करता सध्या स्थितीत शासनाला अत्यावश्यक असलेले कोरोना केअर सेंटर कायम स्वरूपी सुरू करावे. अशी मागणी मोतीलाल टहलीयानी यांनी केली आहे. एक मजली असलेले सदर सभागृह कोरोना केअर सेंटरच्या दृष्टीने सर्व सोयीचे असून किमान ५० खांटाची व्यवस्था याठिकाणी प्रशासनाला करता येणार असल्याने प्रशासनाने त्यादृष्टीने विचार करावा. अशी विनंती मोतीलाल टहलीयानी यांनी जिल्हाधिकारी यांचे सह क्षेञाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे कडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here