राईस मील असोसिएशनने पुरविले कोरोना केअर सेंटरला १०० बेड

0
202

मूल : (प्रतिनिधी)
तालुक्यातील कोरोनाग्रस्तांना संस्थात्मक अलगीकरणात उपचार घेणे सोईचे व्हावे म्हणुन येथील राईस मील असोसिएशनने प्रशासनाला सहकार्याचा हात दिला आहे. कोरोना बाधीतांच्या विश्रांती करीता असोशिएशनच्या वतीने ५० पलंग, गादी, चादर, उशी व सरकारी दवाखान्यात बाधीतांना व नातेवाईकांना बसण्यासाठी बेंच ची व्यवस्था यापुर्वीच केली आहे. दरम्यान तालुक्यात कोरोना बाधीतांचा वाढता आकडा लक्षात घेवुन प्रशासनाने संस्थात्मक कोरोना केअर सेंटर मध्ये खाटांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाने घेतलेल्या वाढीव खाटांच्या निर्णयाला राईस मील असोसिएशनच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी मानवतेच्या दृष्टिकोणातून पुन्हा सहकार्यांचा हात दिला आहे. स्थानिक चामोर्शी मार्गावरील एस.एम.लाँन येथे निर्माण करण्यात आलेल्या ५० खाटांच्या कोरोना केअर सेंटर मध्ये असोसिएशनने पुन्हा ५० नवीन बेड गादी, चादर व उशीसह उपलब्ध करून दिले आहे. राईस मिल असोशिएशनच्या सहकार्यामूळे स्थानिक प्रशासनाने पुन्हा ५० खाटांचे कोरोना केअर सेंटर चामोर्शी मार्गावर कार्यान्वीत केल्याने तालुक्यातील कोरोना बाधीतांना आशेचे किरण मिळाले आहे. दरम्यान प्रशासनाने राईस मिल असोसिएशनच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here