मूल तालुक्यात आज आढळले ६७ कोरोनाग्रस्त

0
173

मूल (प्रतिनिधी)
मूल तालुक्यात आज झालेल्या अँटीजन तपासणीत १८ आणि आरटीपीसीआर तपासणीमध्ये ४९ असे एकुण ६७ जण कोरोना बाधीत सापडले आहे. तालुक्यात आज १२४ जणांनी आरटीपीसीआर तर ८३ जणांनी अँटीजन असे एकुण २०७ जणांनी तपासणी केली. आजपर्यंत तालुक्यात १६२१८ जणांनी कोरोनाची तपासणी केली आहे. मूल तालुक्यात असलेल्या ४६३ कोरोना अँक्टीव्ह रूग्णापैकी ३०२ जण गृह अलगीकरणात तर १६१ जण संस्थात्मक अलगीकरणात आहेत. मूल तालुक्यात आजपर्यंत १३०३५ जणांनी लसीकरणाचा लाभ घेतला असुन सध्यास्थितीत लसींच्या तुटवळ्यामूळे लसीकरण बंद आहे. तालुक्यात निर्माण करण्यात आलेल्या ७५ खाटांच्या उपजिल्हा रूग्णालयातील कोरोना केअर सेंटर मध्ये ५९ तर नवीन माँडेल स्कुल येथील १५० खाटांच्या कोरोना केअर सेंटर मध्ये ९४ असे एकुण १५३ जण मूल येथे तर ९ जण चंद्रपूर येथे उपचारार्थ आहेत. लसींची उपलब्धता होताच तालुक्यातील सर्व लसीकरण केंद्रावर लसीकरणाला सुरूवात करण्यात येईल. अशी माहीती उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here