तालुक्यात काल पेक्षा २० कोरोनाग्रस्त कमी

0
78

मूल (प्रतिनिधी)
मूल तालुक्यात आज झालेल्या अँटीजन तपासणीत २१ आणि आरटीपीसीआर तपासणीमध्ये २६ असे एकुण ४७ जण कोरोना बाधीत सापडले आहे. तालुक्यात आज १३० जणांनी आरटीपीसीआर तर ६५ जणांनी अँटीजन असे एकुण १९५ जणांनी तपासणी केली. आजपर्यंत तालुक्यात १६४१३ जणांनी कोरोनाची तपासणी केली आहे. मूल तालुक्यात असलेल्या ४८६ कोरोना अँक्टीव्ह रूग्णापैकी ३१४ जण गृह अलगीकरणात तर १७२ जण संस्थात्मक अलगीकरणात आहेत. मूल तालुक्यात आजपर्यंत १३०३५ जणांनी लसीकरणाचा लाभ घेतला असुन सध्यास्थितीत लसींच्या तुटवळ्यामूळे लसीकरण बंद आहे. तालुक्यात निर्माण करण्यात आलेल्या ७५ खाटांच्या उपजिल्हा रूग्णालयातील कोरोना केअर सेंटर मध्ये ५८ तर नवीन माँडेल स्कुल येथील १५० खाटांच्या कोरोना केअर सेंटर मध्ये ९९ असे एकुण १५७ जण मूल येथे तर १५ जण चंद्रपूर येथे उपचारार्थ आहेत. काल पेक्षा आज २० कोरोनाबाधीत तालुक्यात कमी मिळाले असल्याने नागरीकांनी शासनाच्या कोरोना संदर्भातील मार्गदर्शक सुचनांचे पालन करून प्रशासनास सहकार्य केल्यास कोरोना बाधीतांचा आकडा निश्चितच कमी झाल्याशिवाय राहणार नाही. असा विश्वास स्थानिक प्रशासनाने व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here