शहरात आलेल्या अस्वलीला पकडून जंगलात सोडले

0
87
  1. मूल (प्रतिनिधी) भरकटुन लोकवस्तीत आलेल्या एका अस्वलीने भल्या पहाटे अनेकांना दर्शन दिल्याने परीसरात काहीकाळ भितीचे वातावरण पसरले होते. पण वन विभागाने अस्वलीला पकडून जंगलात सोडल्याने नागरीकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. येथील बफर झोनचे वनपरीक्षेञ अधिकारी नायगमकर यांना पहाटे ५.३० वा. चे सुमारास एक अस्वल वन कार्यालयाच्या परीसरात शिक्षक काँलनी लगत आश्रयाने असल्याचे दिसुन आले. अनावधानाने लोकवस्तीत आलेली अस्वल अनेकांना दिसल्याने सदर अस्वल कुतुहलाची तर काहींना दहशतीची वाटु लागली. त्यामुळे  लोकवस्तीत आलेल्या अस्वलीला पकडून जंगलात सोडण्यासाठी स्थानिक वनाधिकारी राजुरकर, ताडोबा येथील आरआरटी पथक व संजीवन पर्यावरण संस्थेचे उमेशसिंह झिरे यांना माहीती देण्यात आली. दरम्यान अस्वलीला पाहण्यासाठी नागरीकांनी गर्दी केल्याने अस्वलीला पकडण्याची मोहीम सुरू केली, दरम्यान बघ्यांच्या आवाजाने घाबरलेल्या अस्वलीने भिंतीवरून उडी मारून पलीकडच्या खाजगी स्नानगृहा लगतच्या बोळीत आसरा घेतल्यानंतर आरआरटी पथक ताडोबाचे मदतीने सदर अस्वलीला बेशुध्दीचे इंजेक्शन मारून सुरक्षीतपणे पकडण्यात आले. बेशुध्द झालेल्या ३ वर्षाच्या मादी अस्वलीला पकडल्यानंतर केळझरच्या जंगलात सोडण्यात आले. सदर  अस्वलीला मागील काही दिवसांपासुन रेल्वे स्टेशन, कर्मवीर महाविद्यालय, चरखा संघ, उपजिल्हा रुग्णालय आणि विहीरगांव परीसरात राञौच्या वेळेत अनेकांनी पाहले आहे. परंतु सदर अस्वलीने आजपर्यंत कोणावरही हल्ला केल्याचे ऐकीव्यात नाही. मूल शहर हे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या जंगला लगत असल्याने यापुर्वीही एका अस्वलीने चरखा संघ परीसरात, कर्मवीर महाविद्यालयाच्या शौचालयात आसरा घेतला होता तर एका अस्वलीने रेल्वे फाटका लगतच्या वर्दळीच्या पुलाखाली  पिल्लांना जन्म दिला होता. एक  दोनदा हरणालाही शहरातील विविध भागात फिरतांना अनेकांनी पाहले. आज पुन्हा एका अस्वलीने चक्क वन कार्यालयातच आश्रय घेतल्याने सदर घटनेची शहरात चर्चा आहे.   अस्वलीला पकडण्याच्या वेळेस सहाय्यक उपवन संरक्षक लखमावाड, वनपरिक्षेत्र अधिकारी राजुरकर, टीटीसीचे डॉ.पोडचलवार, अजय मराठे यांचे नेतृत्वात आरआरटी पथक, क्षेत्र सहाय्यक खनके, वनरक्षक मरसकोल्हे, गुरनुले, विषेश व्याघ्र संरक्षन पथक व संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्य प्रशांत मुत्यारपवार, स्वप्निल आक्केवार, दिनेश खेवले,अंकुश वाणी , संकल्प गणवीर, प्रतीक लेनगुरे, यश मोहुर्ले आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here