तालुक्यात आज आढळले २७ कोरोना रूग्ण

0
44

मूल (प्रतिनिधी)
तालुक्यात आज झालेल्या अँन्टीजन तपासणीमध्ये २७ जण कोरोना बाधीत सापडले असुन आरटीपीसीआर तपासणी मध्ये एकही आढळला नाही. तालुक्यात आज १७८ जणांनी आरटीपीसीआर तर ११६ जणांनी अँटीजन असे एकुण २९४ जणांनी तपासणी केली. आजपर्यंत तालुक्यात १७०१६ जणांनी कोरोनाची तपासणी केली आहे. मूल तालुक्यात असलेल्या ४४८ कोरोना अँक्टीव्ह रूग्णापैकी २६४ जण गृह अलगीकरणात तर १८४ जण संस्थात्मक अलगीकरणात आहेत. मूल तालुक्यात आजपर्यंत १३२०१ जणांनी लसीकरणाचा लाभ घेतला असुन आज तालुक्यातील सर्व लसीकरण केंद्र लसींअभावी बंद होते. तालुक्यात निर्माण करण्यात आलेल्या ७५ खाटांच्या उपजिल्हा रूग्णालयातील कोरोना केअर सेंटर मध्ये ३८ तर नवीन माँडेल स्कुल येथील १५० खाटांच्या कोरोना केअर सेंटर मध्ये १०९ असे एकुण १४७ जण उपचारार्थ आहेत. तालुक्यातील कोरोना केअर सेंटर मध्ये सध्या ७८ खाटा उपलब्ध आहेत. गरजुंनी प्रशासनाशी संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here