कोरोना बाधीतांचा आकडा वाढल्याने नागरीकांनी घाबरू नये

0
118

मूल (प्रतिनिधी)
कोरोना बाधीतांच्या तपासणीत आज मूल तालुक्यात आरटीपीसीआर तपासणी मध्ये ६३ तर अँटीजन तपासणीत २५ असे ८८ व्यक्ती तर सावली तालुक्यात आरटीपीसीआर तपासणीत ३६ तर अँटीजन तपासणीत १८ असे ५४ व्यक्ती कोरोना बाधीत सापडल्याने स्थानिक प्रशासन चिंतेत सापडले आहे. अलीकडील दिवसात कोरोना बाधीतांचा आकडा कमी होत असतांना आज मूल उपविभागातील मूल आणि सावली तालुक्यात रूग्ण वाढल्याने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरीकांनी सहकार्य करावे. असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. मूल तालुक्यात नोंद असलेल्या ४४४ कोरोना बाधीतांपैकी २६१ जण गृह अलगीकरणात तर १८३ रूग्ण संस्थात्मक अलगीकरणात उपचार घेत आहेत. तर सावली तालुक्यात ३३१ अँक्टीव्ह रूग्णपैकी १५४ जण गृह विलगीकरणात तर १५७ जण संस्थात्मक अलगीकरणात उपचार घेत आहेत. मूल आणि सावली तालुक्यातील लसीकरण केंद्रावर लस संपल्याने लसीकरण बंद होते. मूल तालुक्यात आज १२९ जणांनी आरटीपीसीआर तर ८२ एकुण जणांनी अँटीजन असे एकुण २११ तर सावली तालुक्यात ४६ जणांनी आरटीपीसीआर तर ९३ जणांनी अँटीजन असे एकुण १३९ व्यक्तींनी कोरोनाची तपासणी केली. मूल तालुक्यात निर्माण करण्यात आलेल्या ७५ खाटांच्या उपजिल्हा रूग्णालया मधील कोरोना केअर सेंटर मध्ये ५० तर नवीन माँडेल स्कुल मधील १५० खाटांच्या कोरोना केअर सेंटर मध्ये १२० असे एकुण १७० जण तर सावली तालुक्यातील १२५ खाटांच्या राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय येथील कोरोना केअर सेंटर मध्ये ११० जण उपचार घेत आहेत. कोरोना बाधीतांचा आकडा कमी होत असताना आज अचानक पुन्हा वाढल्याने नागरीकांनी घाबरून न जाता शासनाच्या कोरोना संदर्भातील मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे. कामाशिवाय घराबाहेर निघु नये आणि निघाल्यास माँस्कचा वापर केल्याविना राहु नये. अशी विनंती उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनुज तारे (भाप्रसे) यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here