पुल बांधकामाच्या चौकशीची राजु झोडे यांची मागणी

0
13

मूल (प्रतिनिधी)
तालुक्यातील ताडाळा- बोरचांदली मार्गावरील उमा नदीवर करण्यात येत असलेले पुलाचे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे होत असल्याने त्याची चौकशी करावी. अशी मागणी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजु झोडे यांनी केली आहे.
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंञी यांना पाठविलेल्या निवेदनात झोडे यांनी पुलाच्या बांधकामात सळाख आणि लोखंडी सळाखीचा अत्यंत कमी वापर होत असुन निकृष्ठ दर्जाचे साहीत्य वापरल्या जात आहे. त्यामुळे सदर पुलाचे बांधकामात अधिकारी आणि कंञाटदार संगनमताने कोट्यावधीचा गैरव्यवहार करीत असल्याचे दिसुन येत आहे. त्यामुळे जनतेच्या सोयीसाठी बांधण्यात येत असलेला सदर पुल किती दिवस उत्तम राहील. याविषयी शंका व्यक्त करतांना झोडे यांनी सदर कामाची चौकशी करण्यात यावी. अशी मागणी करतांना संबंधित कंञाटदाराला काळ्या यादीत टाकावे. अशी विनंती केली आहे. झोडे यांनी सदर मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना दिली आहे. यावेळी संघटनेचे पदाधिकारी प्रशांत उराडे, संपत कोरडे, रोहीत बोबाटे, सुरज टिकले, सुरज निमगडे आदी उपस्थित होते.

ताडाळा-बोरचांदली मार्गावरील उमा नदीवर ज्या पुलाचे बांधकाम सुरू आहे तो पुल आर्च टाईप इको फ्रेंडली प्रकारचा आहे. होत असलेले पुलाचे बांधकाम तालुक्यात पहीले असुन हा अभिनव प्रकल्प आहे. सदर पुल आर्च टाईप रेन फोर्समेंट असल्याने या ठिकाणी लोखंडी सळाख आणि सिमेंटचा वापर बांधकाम निकषानुसारचं होत असुन वापरण्यात येत असलेले साहीत्य उच्च व दर्जेदार प्रतीचेच वापरल्या जात आहे.
प्रशांत वसुले
उपविभागीय अभियंता
सा.बां.उपविभाग मूल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here