आठवडाभरात लसींच्या तुटवळ्याची समस्या दुर होणार – ना. विजय वडेट्टीवार

0
130
मूल (प्रतिनिधी) मागणीच्या तुलनेत राज्याला कमी प्रमाणांत लसी मिळत असल्याने राज्यात लसींचा तुटवळा जाणवत आहे, परंतू येत्या आठवडयात लसींच्या तुटवळयाची समस्या सुटणार असून मागणी प्रमाणे उपलब्धता होणार असल्याने १८ वर्षावरील सर्व पात्र नागरीकांना लसींचा मिळणार असल्याचे मत पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.  स्थानिक काॅंग्रेस भवनात आयोजीत लसीकरण नोंदणी सेवा केंद्राचे उद्घाटन आज ना. वडेट्टीवार यांचे हस्ते छोटेखानी स्वरूपात पार पडले. याप्रसंगी ते बोलत होते. कोरोना पासून नागरीकांचे जीवन सुरक्षीत राहावे या उद्देशाने शासनाने कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम युध्दपातळीवर सुरू केली आहे. सुरू केलेल्या लसीकरण योजनेचा लाभ १८ ते ४४ वयोगटातील नागरीकांना घेता यावा म्हणून शासनाने आॅनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. परंतू लागु असलेल्या लाॅग डाऊन मूळे आँनलाईन केंद्र बंद असल्याने नागरीकांची गैरसोय होत आहे. त्यामूळे नागरीकांची गैरसोय टाळण्यासाठी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी तालुका काॅंग्रेस पार्टीच्या सहकार्याने स्थानिक काॅंग्रेस भवन येथे विनाशुल्क आँनलाईन नोंदणी सेवा केंद्र सुरू केले आहे. सुरू केलेल्या आँनलाईन सेवा केंद्राचे उद्घाटन राज्याचे मदत व पुनवर्सन तथा बहुजन कल्याण मंत्री आणि जिल्हयाचे पालकमंत्री नाम. विजय वडेट्टीवार यांचे शुभहस्ते आज संपन्न झाले. यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचेसह तालुका काॅंग्रेसचे अध्यक्ष घनश्याम येनुरकर, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे तालुकाध्यक्ष राकेश रत्नावार, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कन्नमवार, नगरसेवक लिना फुलझेले, महिला काॅंग्रेस अध्यक्ष रूपाली संतोषवार, युवक काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष पवन निलमवार, शहर अध्यक्ष व्यंकटेश पुल्लकवार, संदिप म्हस्के, क्रांती ज्योती नागरी सहकारी पत संस्थेचे अध्यक्ष गुरू गुरनूले, आदिवासी विकास परिषदेचे तालुकाध्यक्ष अशोक येरमे, साई मित्र बहुउद्देशिय संस्थेचे सचिव विवेक मुत्यलवार, संदीप मोहबे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here