सावली तालुक्यामध्ये डी. सी.गुरूबक्षाणी कन्स्ट्रक्शन कंपनी कडून फ्रंट लाइन वर्कर्स साठी वैद्यकीय साहित्याचा पुरवठा

0
41

मूल (प्रतिनिधी) सावली तालुक्यामध्ये कोविड संदर्भात वैद्यकीय सेवा देणाऱ्या सर्व शासकीय डॉक्टर्स, नर्सेस व अन्य पॅरामेडीकल स्टाफ साठी वैद्यकीय साहित्याचा पुरवठा डी.सी.गुरूबक्षाणी कन्स्ट्रक्शन कंपनी कडून करण्यात आला. कंपनीतर्फे सागर निंबाळकर राजकुमार मेघवानी यांनी सावली  येथील तहसिलदार परीक्षित पाटील यांच्या उपस्थितीत तालुका आरोग्य अधिकारी डाँ. मनोहर मडावी व वैद्यकीय अधिकारी डाँ. सौरभ गोबाडे यांच्याकडे साहित्य सुपूर्द केले. यामध्ये पीपीइ किट, एन-९५, मास्क, ग्लोव्हज,    फेस शिल्ड इ. साहित्याचा समावेश आहे. समाजउपयोगी कामामध्ये मदत दिल्याने सावली चे तहसिलदार परीक्षित पाटील यांनी कंपनी व्यवस्थापना विषयी कृतघ्नता व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here