*प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचे काम लवकर पुर्ण करावे- युकाँध्यक्ष पवन निलमवार यांची मागणी

0
75

मूल (प्रतिनिधी)
दिड वर्षापासुन सुरू असलेले प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम लवकरात लवकर पुर्ण करून नागरीकांना उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यावी. अशी मागणी मूल तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष पवन निलमवार यांनी केली आहे.
परीसरातील चवदा गांवातील नागरीकांना आरोग्याची उत्तम व तात्काळ सेवा मिळावी म्हणुन बेंबाळ प्राथमिक आरोग्य केंद्राची जुनी इमारत पाडुन त्याठिकाणी नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात येत आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत ३ कोटी ६९ लाख रूपये खर्चाच्या या बांधकामात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती व्यतीरिक्त १० कर्मचारी निवास स्थान याठिकाणी उभे राहणार आहे. आरोग्याची उत्तम सेवा मिळावी या उद्देशाने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नव्या इमारतीचे बांधकाम होत असले तरी पर्यायी व्यवस्था न करता हाती घेण्यात आल्याने कोरोनाच्या या संकट काळात नागरीकांना आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत ञासदायक होत असल्याचा आरोप युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पवन निलमवार यांनी केला आहे. दिड ते दोन वर्षापासुन सुरू असलेले सदर बांधकाम के.सी. पटेल नामक कंञाटदार करीत असुन सदर बांधकाम कासवगतीने होत असल्याने प्रसुती करीता बांधण्यात आलेल्या एका खोलीच्या जुन्या इमारती मध्ये सध्या प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू आहे. यामुळे नियमित तपासणी करीता येणाऱ्या परीसरातील गर्भवती महीलांना ओपीडी संपेपर्यंत वाट बघावी लागत असल्याने त्यांना नाहक ञास सहन करावा लागत असल्याचा आरोपही निलमवार यांनी केला आहे. परीसरातील एखाद्या व्यक्तीची प्रकृती अचानक ढासळल्यास किंवा अपघात घडल्यास तातडीच्या उपचाराकरीता या ठिकाणी इमारती अभावी पुरेशी व्यवस्था नसुन डाँक्टर आणि संबंधीत कर्मचारीही राहत नसल्याने रूग्णांना मूल किंवा चंद्रपूर येथे हलवावे लागते, यामूळे योग्य उपचाराकरीता वेळ लागत असल्याने रूग्ण दगावण्याची शक्यता अधीक आहे. बेंबाळ हे गांव मूल गोंडपिपरी राज्य मार्गावर मध्यवर्ती ठिकाणी आहे. तालुक्यात मोठे गांव म्हणुन ओडख असलेल्या बेंबाळ आरोग्य केंद्राशी जोडलेली गांवेही लोकसंख्येच्या दृष्टीने मोठीच आहेत. त्यामुळे येथील आरोग्य केंद्रात उपचारा करीता येणाऱ्या नागरीकांची संख्याही मोठी असते. त्यामुळे दिड ते दोन वर्षापासुन सुरू आसलेले आरोग्य केंद्राचे बांधकाम तातडीने होणे आवाश्यक होते पण कोरोनाचे कारण समोर करून कंञाटदार आणि सदर कामावर देखरेख ठेवणारे अभियंता वेळकाढु धोरण अवलंबत असल्याने कोरोनाच्या या संकट काळात आरोग्याची उत्तम सेवा देणारे येथील आरोग्य केंद्र नाममाञ ठरत आहे, त्यामुळे कासवगतीने सुरू असलेले प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम लवकरात लवकर पुर्ण करण्या संबंधी संबंधितास निर्देश द्यावे, अशी मागणी पवन निलमवार यांनी जिल्ह्याचे पालक मंञी विजय वडेट्टीवार, खासदार बाळुभाऊ धानोरकर, आमदार सुधीर मुनगंटीवार आणि जिल्हा परीषद अध्यक्ष संध्याताई गुरनुले यांचे कडे निवेदनाद्वारे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here