जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून संकटग्रस्तांना अर्थसहाय्य

0
70

मूल (प्रतिनिधी) शेतकरी व सामान्य जनतेच्या हक्काची बँक असलेल्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या शेतकरी कल्याण निधी अंतर्गत बल्लारपुर तालुक्यातील मानोरा येथील शेतकरी श्रीनिवास गणपत धोडरे ह्यांना कँन्सरने आजारी असलेल्या पत्नीच्या उपचारा करीता ३६ हजाराचा आणि तालुक्यातील आगळी येथील वाघाच्या हल्यात मृत्युमुखी पडलेल्या कल्पना वाढई हीचा वारस दिनेश नामदेव वाढई आणि जानाळा येथील मृतक वनिता गेडाम यांची वारस दिशा वसंत गेडाम आणि मृतक किर्तीराम कुळमेथे यांची पत्नी विश्रांती किर्तीराम कुळमेथे यांना प्रत्येकी १० हजार रूपयाचा धनादेश आज बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे हस्ते मूल येथील बँकेच्या कार्यालयात देण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष अरविंद बोकारे, कृषी उत्पन्न बाजार समिती मूलचे सभापती तथा काँग्रेसचे तालुका अध्यक्ष घनश्याम येनुरकर, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे अध्यक्ष तथा बाजार समिती संचालक राकेश रत्नावार, विविध कार्यकारी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कन्मवार, नगर सेवक विनोद कामडे, भेजगांव येथील सरपंच अखील गांगरेड्डीवार, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पवन निलमवार, क्रांतीज्योती नागरी सहकारी पत संस्थेचे अध्यक्ष गुरू गुरनुले, ताडाळा येथील सरपंच राहुल मुरकुटे, जानाळा येथील धनराज रामटेके, बापु मडावी, बँकेचे अधिकारी नंदुजी मडावी आणि शाखा व्यवस्थापक वाळके उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here