राजीव गांधी पुण्यतिथी

0
11
  1. *भारताचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या स्मृती दिनानिमित्य वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्यांच्या नायवाईकांना मध्यवर्ती सह.बँकेकडून आर्थिक मदत*व रुग्णांना मार्कस, सॅनिटाइझरचे वाटप मुल- माहिती व तंत्रज्ञान क्रांतीचे जनक,स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना ३३ टक्के आरक्षन,व १८ वर्ष वरील युवकांना मतदानाचा अधिकार देणारे भारताचे युवा पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांच्या स्मृतिदिन व सदभावना दिन म्हणून साजरा करण्यात आला. तालुका कांग्रेस कमिटीत स्व.राजीव गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी जि. प.अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी तालुका कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती घनश्याम येनुरकर, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष राकेश रत्नावार, संचालक अखिल गांगरेड्डीवार,राजेंद्र कन्नमवार, माजी नगराध्यक्ष अरविंद बोकारे, नगर सेवक विनोद कामडे, युवक कांग्रेस अध्यक्ष पवन निलमवार, उपसरपंच राहुल मुरकुटे, यांचेसह तालुक्यातील व नगरातील कांग्रेस कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून स्व.राजीव गांधी यांना पुष्पहार वाहून अभिवादन केले. *याच दिनानिमित्य मुल तालुक्यात वाघाने ठार केलेल्या मृतकांच्या नातेवाईकांना चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने अध्यक्ष संतोषशिंह रावत यांचे हस्ते कांतापेठ येथील मृतक कल्पना वाढई यांच्या मुलाला १०,०००/-रुपयाचा चेक देण्यांत आला. तसेच जानाला येतील मृतक किर्तीराम कुलमेथे यांची पत्नी श्रीमती, विश्रांती कुलमेथे यांनाही १०,०००/-रुपयाचा चेक देण्यात आला. वसंत गेडाम यांचे नातेवाईक कु.दिशा गेडाम यांनाही रावत यांचेहस्ते १०,०००/-चेक देण्यात आला. याप्रसंगी धनराज रामटेके, बापू मडावी उपस्थित होते.* *राजीव गांधी स्मृर्ती प्रित्यर्थ कोरोना क्वारंटईन सेंटर,अँटीजन तपासणी केंद्र,उपजिल्हा रुग्णालयात मॅक्स,सॅनिटायझर,हॅन्डक्लोज वाटप* भारताचे पंतप्रधान स्व.राजीवजी गांधी यांच्या स्मृती दिनांनिमित्त मुल येथे कोरोना सनसर्गाच्या रोगाने पझिटिव्ह रुग्ण ठेवण्यात आलेल्या नगर परिषदेच्या नवनिर्मित शाळेच्या भव्य प्रशस्त इमारतीमध्ये असलेल्या संस्था विलगिकरन केंद्रात १०५ रुग्णांना मार्कस, सॅनिटायझर,व डॉकटर,नर्स,आरोग्य विभागाचे कर्मचारी यांना हेंडग्लोजचे वाटप करण्यात आले. तसेच कोरोना रुग्णांची अँटीजन तपासणी व आर.टी. पी.सी.आर.तपासणी केंद्र असलेल्या पत्रकार भवनाच्या इमारतीमध्ये सुद्धा डॉकटर,नर्स,कर्मचारी स्टाफ यांना मार्कस, सॅनिटायझर,हॅन्डक्लोज वाटप करण्यात आले.तसेच उपजिल्हा रुग्णालयात कोरोना पझिटिव्ह सेंटर मध्ये भरती असलेल्या रुग्णांना व त्यांची देखभाल ,तपासणी करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी,आरोग्यकर्मचारी यांनी मार्कस, सॅनिटायझर बाटल्स, हॅन्डक्लोज चे वाटप करण्यात आले.हे साहित्य चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, संतोषशिंह रावत यांचे तर्फे पुरवठा करण्यात आला असून साहित्य वाटपाचे काम कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष घनश्याम येनुरकर,संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष राकेश रत्नावार,संचालक अखिल गांगरेड्डीवार,युवक कांग्रेस अध्यक्ष पवन निलमवर,उपसरपंच राहुल मुरकुटे,नगर सेवक विनोद कामडे, व कांग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here