जेवनाचा डब्बा देवुन घराकडे निघालेला मनोहर वाघाचा हल्ल्यात ठार

0
280

मूल : (मूल न्युज प्रतिनिधी) नहरा लगतच्या आंब्याच्या झाडाचे आंबे तोडण्यास गेलेल्या मारोडा येथील मनोहर आडकुजी प्रधाने याला वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना आज सकाळी घडली. तालुक्यातील मारोडा येथील आदर्श खेड्यात राहणारा मनोहर आडकुजी प्रधाने (६८) हा रोजगार हमी योजनेच्या कामावर गेलेल्या मुलगा आणि सुनेला जेवनाचा डब्बा देवुन नहरा लगतच्या आंब्याच्या झाडाचे आंबे तोडुन घराकडे परत येत असतांना नहरात विश्रांती घेत असलेल्या किंवा पाणी पिण्यासाठी आलेल्या वाघाने त्याचेवर हल्ला केल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यु झाल्याची घटना घडली. सकाळी गेलेला मनोहर दुपारी १२ वा. पर्यत घरी परत न आल्याने त्याचा शोध घेतला असता मनोहर प्रधाने नहराच्या काठावर मृतावस्थेत दिसला. मृतक मनोहरचा पाय तोडलेला आणि गळा चिरलेला दिसल्याने वाघानेच त्याला ठार केल्याचे निष्पन्न झाले. घटनेची माहीती होताच वनपरीक्षेञ अधिकारी जी.आर.नायगमकर, क्षेत्र सहाय्यक पाकेवार, वनरक्षक उईके, पारधे आणि ठाकरे यांनी घटनास्थळी भेट दिली. मृतक मनोहर प्रधाने यांच्या कुटूंबियास वनविभागाने २५ हजार रूपयाची तातडीची मदत दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here