शासनाला मदत करणाऱ्या व्यापाऱ्यांना शासनाने सहकार्य करावे-मोतीलाल टहलीयानी यांची मागणी

0
53

मूल (प्रतिनिधी)  कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी जाहीर केलेल्या लाँक डाऊन काळात दुकान बंद ठेवुन शासनाला मदतीचा हात देणाऱ्या विविध विक्रेत्यांना भराव्या लागणाऱ्या विविध करात पन्नास टक्के सवलत द्यावी. अशी मागणी येथील व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मोतीलाल टहलीयानी यांनी केली आहे.
मागील पंधरा महीण्यापासुन देश कोरोनाचा संकटात आहे. देशावरील कोरोनाचे संकट दुर करण्यासाठी देशातील प्रत्येक राज्य आपआपल्या परीने काम करतांना महाराष्ट्र सरकारने कोरोनाची साखळी तोडण्या साठी लाँक डाऊनची पध्दती अवलंबीली, लाँक डाऊनच्या काळात नागरीकांची व्यापारपेठ आणि मार्गावरील गर्दी कमी करण्यासाठी व्यापारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. देशावरील संकट आणि कोरोना मूळे होणारी जीवीत हानी लक्षात घेवुन लहान मोठे विविध व्यवसाय करून कुटूंबाचा उदरनिर्वाह भागविणा-या विक्रेत्यांनी शासनाच्या विनंतीचा स्विकार करत प्रत्येकाने आपआपली दुकाने बंद ठेवुन लाँक डाऊनच्या रूपाने कोरोनाची साखळी तोडण्यास शासनाला सहकार्य केले आहे. लाँक डाऊनच्या कडक नियमांचे पालन करतांना शेतकरी, गरीब, मागास व सामान्य जनते सोबतच लहान विक्रेत्याना प्रचंड ञास सहन करावा लागला. दिवसभर हातगाडीवर, एखाद्या कोप-यात, लहान व्यवसाय करून कुटूंब चालविणा-या विक्रेत्यांना कुटूंब चालविणेही कठीण झाले होते. अशी विदारक परिस्थिती शेकडो लघु व्यावसायीकांवर आली आहे. तरीसुध्दा शासनाच्या लाँक डाऊनचा आदर करत शासनाला मदत करीत आहेत. अश्या भयावह परीस्थितीत शासन ज्या प्रमाणे शेतकरी, शिधापञीका धारक, कामगार, समाजातील अन्य मागास पाञ लाभार्थ्यांना विविध माध्यमातुन मदतीचा हात देत आहे, त्याच धरतीवर लाँक डाऊन यशस्वी करण्यास सहकार्य करणाऱ्या व्यापाऱ्यांना शासनाने थोडी फार मदत जाहीर करावी. अशी विनंती मोतीलाल टहलीयानी यांनी केली आहे. लाँक डाऊनच्या काळात व्यापार पेठ बंद असुनही व्यापा-यांना घर भाडे, विद्युत बिल, मालमत्ता, पाणी व संपत्ती कर, जीएसटी, आयकर, व्यवासाय कर, विविध बँकेकडून व्यवसाया करीता घेतलेल्या कर्जाचे हप्ते, त्यावरील व्याज, दुकानातील कामगारांचा पगार, व्यवसायाकरीता घेतलेल्या वाहनावरील कर्जाचे हप्ते भरावेच लागणार आहे. व्यवसाय बंदच्या काळात आर्थिक उत्पन्न शुन्य असतांनाही विक्रेत्यांना शासनाला देय असलेल्या विविध कराची, हप्त्याची रक्कम, घरमालकाचा घर भाडा न चुकता देणेच असल्याने सदर रक्कम आणायची कोठुन ? असा गंभीर प्रश्न व्यापाऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. शासकिय व निमशासकिय कार्यालय, शाळा, महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना लाँक डाऊनच्या काळात गर्दी टाळण्यासाठी वर्क फार्म होम अंतर्गत घरी राहुन काम करण्याची मुभा दिली. परंतु त्यांचे पाच ते सहा आकडी रक्कमेचे पगार सुरूच होते. तसे विविध व्यवसाय करून कुटूंब चालविणा-यांचे नाही. त्यांना व्यवसाय केल्याशिवाय कुटूंबाची भुक भागविणेच शक्य नव्हते. त्यामुळे व्यापारपेठेतील अनेक व्यापारी संकटात सापडले असुन अनेकांच्या व्यवसायाचे तीन तेरा वाजले आहे. अश्या संकट प्रसंगी ज्यांच्या सहकार्याच्या आधारे शासनाला शासन चालविण्यास मोलाची मदत होते त्या व्यापाऱ्यांना भराव्या लागणाऱ्या विविध करात ५० टक्के सवलत द्यावी. अशी मागणी मोतीलाल टहलीयानी यांनी केली असुन व्यापाऱ्यांची ही रास्त मागणी लोकप्रतिनिधी शासन स्तरावर उचलुन धरतील. अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here