उपजिल्हा रुग्णालयातील नादुरुस्त एक्स रे मशीन सुरू करा – भाजपाची मागणी

0
39

मूल : (प्रतिनिधी) कोरोना संसर्गाच्या काळात अनेक लोकांना कोरोनाची लागण झाल्यानंतर फुफ्फुसात किती प्रमाणात संसर्ग झाला आणि त्याचा स्कोर किती. हे माहिती करून घेण्यासाठी डॉक्टर लोक रुग्णाला सिटी स्कॅन करायचा सल्ला देत आहेत. सिटी स्कॅन केल्यानंतर फार अत्यल्प लोकांचा स्कोर हा जास्त निघतो तर बहुतांश लोकांना मात्र नाहक सिटी स्कॅन काढावे लागते. सुरूवातीला एक्स रे काढल्यास ब-याच गोष्टी ह्या एक्स रे रिपोर्ट वरून समजून येतात. असे असतानाही मात्र विनाकारण सिटी स्कॅन चा सल्ला देऊन रूग्णांना लुबाडले जात आहे. सरकारी दर 2500 रू. असताना अनेक खाजगी केंद्रात जादा दर आकारून रुग्णांची आर्थिक लुट केल्या जात आहे. नुकतेच जागतिक आरोग्य संस्थेने सिटी स्कॅन काढल्यास 200 एक्सरे इतकं रेडिएशन शरीरात जाऊन भविष्यात रुग्णांना कर्करोगा सारख्या रोगांना सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही असं जाहीर केलं आहे. मूल परीसरात सिटी स्कॅन ची व्यवस्था नसल्याने रुग्णांना चंद्रपूर किंवा अन्य मोठ्या शहरात जाऊन दिवसभर ताटकळत, मानसिक त्रास सहन करीत सिटी स्कँन करून घेत आहेत. मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात एक्सरे मशीन उपलब्ध आहे मात्र लहानश्या तांत्रिक बिघाडामुळे ती नादुरुस्त असल्याची प्राथमिक माहिती आहे. ती दुरुस्त झाल्यास कोविड रुग्णांना इथल्या इथेच एक्सरे ची सुविधा उपलब्ध होऊन त्यांना होणार आर्थिक, मानसिक त्रास होणार नाही तसेच विनाकारण सिटी स्कॅन काढल्याने त्यांना भविष्यात आरोग्याचा पण प्रश्न निर्माण होणार नाही. सर्वच रुग्णांचे मूल येथेच एक्सरे रिपोर्ट बघून त्यांना पुढचा सल्ला द्यायला वैधकीय अधिका-यांना सुध्दा सोयीचे होईल, त्यासाठी मूल येथील उपजिल्हा रुग्णालयातील नादुरुस्त एक्स रे उपकरण लवकरात लवकर दुरुस्त करून जनतेच्या सेवेत द्यावे अशी विनंती नगर परिषद उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, बांधकाम सभापती प्रशांत समर्थ, भाजपा ओ बी सी सेल चे राकेश ठाकरे यांनी उपविभागीय अधिकारी महादेव खेळकर यांचे कडे निवेदनाव्दारे केली आहे.,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here