मूल मध्ये शिंपी समाज संघटन दिवस साजरा

0
49

मूल :- स्थानिक गावात शिंपी समाज संघटन दिवस साजरा करण्यात आला.यावेळी समाजाचे दैवत आणि पालनहार असलेल्या शिलाई मशीनचे पुजन करण्यात आले. २७ मे २०२७ रोजी मूल मध्ये शिंपी समाज राज्य परिषदेची स्थापना करण्यात आली होती. त्या स्थापना दिनाचे औचित्य साधून दरवर्षी शिंपी समाज बांधवातर्फे समाज संघटन दिन म्हणून साजरा करण्यात येते. मूल येथील नागपूर विभाग प्रमूख प्रशांत गटलेवार यांचे निवासस्थानी छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला. राज्य परिषदेचे कोषाध्यक्ष संतोष शनगनगवार यांच्या हस्ते समाजाचे पालनहार आणि दैवत असलेल्या शिलाई मशीनची विधीवत पुजन आणि मालार्पण करण्यात आले. समाज संघटन काळाची गरज आहे. संघटनाशिवाय समाजाचे प्रश्न सुटत नाही. शिंपी समाजाचे विविध प्रश्न आ वासून असल्याने समाजाची आर्थीक स्थिती दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली आहे.कोरोनाच्या लॉकडाउन काळात शिलाई मशीनवर अंवलंबून असलेल्या समाज बांधवाना मोठा आर्थिक फटका बसला. टेलरिंग व्यवसायावर संसाराचा गाडा हाकलणा-या समाज बांधवांना शासनाने आर्थिक मदत करावी असे मत राज्य कोषाध्यक्ष संतोष शनगनवार यांनी व्यक्त केले.यावेळी नागपूर विभाग प्रमूख आणि राज्य कार्यकारीणी सदस्य प्रशांत गटलेवार, निलेश नंदगिरवार आणि समाज बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here