सुधीरभाऊनी दिलेल्या ऑक्सिजन काँन्स्ट्रेटरचे लोकार्पण संपन्न

0
16

मूल : सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक चळवळीत अग्रेसर असलेल्या मूल येथील श्रीकृष्ण ग्रुपला माजी मंञी तथा आ. सुधीर मुनगंटीवार यांनी गरजु नागरीकांची अडचण सोडविण्यासाठीआँक्सीजन काँन्स्ट्रेटेटर भेट देवुन ग्रृपच्या वाटचाली मोलाची मदत केली आहे. एका छोटेखानी कार्यक्रमात आ. सुधीर मुनगंटीवार यांनी भेट दिलेल्या ऑक्सिजन काँन्स्ट्रेटेटरचे लोकार्पण नगराध्यक्ष रत्नमाला भोयर यांचे हस्ते फित कापुन संपन्न झाले, यावेळी नगर परीषद उपाध्यक्ष तथा श्रीकृष्ण ग्रृपचे मार्गदर्शक नंदकिशोर रणदिवे, भाजपा शहर अध्यक्ष प्रभाकर भोयर, न.प.सभापती प्रशांत समर्थ, प्रशांत लाडवे आदी उपस्थित होते. ग्रृपचे मुख्य प्रवर्तक किशोर कापगते यांनी प्रस्तावना व्यक्त करतांना गरजुंना ग्रृप व्दारे शव शितपेटी, अंत्य संस्कारा करीता स्टीलची तिरडी विनामूल्य दिल्या जात असुन गरजेचे आणि महत्वाचे काही उपक्रम येत्या काळात राबविण्याचा मनोदय व्यक्त केला. नगराध्यक्ष रत्नमाला भोयर यांनी ग्रुपच्या सेवाभावी कार्यांची प्रशंसा करतांना मणुष्याच्या शेवटच्या काळात श्रीकृष्ण ग्रृप शव शितपेटी आणि स्टील तिरडी शहरवासियांना उपलब्ध करून देत असल्याबद्दल आभार मानले. न.प.उपाध्यक्ष तथा ग्रृपचे मार्गदर्शक नंदकिशोर रणदिवे यांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आँक्सीजन काँन्स्ट्रेटेटर भेट देवुन ग्रृपला जनसेवेची संधी दिली, त्याबद्दल सुधीर मुनगंटीवार यांचे प्रती आभार व्यक्त केले. भाजपा शहराध्यक्ष प्रभाकर भोयर यांनी ग्रृपच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देतांना सहकार्य करण्याची घोषणा केली, कार्यक्रमाचे संचालन सदस्य राकेश ठाकरे यांनी तर आभार सदस्य अँड. बल्लु नागोसे यांनी मानले. यावेळी संजय चिंतावार, अक्षय गजापुरे, सचिन गाजुलवार, सौरव वाढई, गौरव गजापुरे, हेमंत शेंडे आदी सदस्यांची उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here