श्रीकृष्ण ग्रुपला आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या कडून ऑक्सीजन कॉन्संट्रेटर प्राप्त

0
21

श्रीकृष्ण ग्रुपला आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या कडून ऑक्सीजन कॉन्संट्रेटर प्राप्त
सोशल मिडीयाच्या माध्यमातून रूग्णसेवा
मूलः- येथील सोशल मिडीयाच्या माध्यमातून सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या श्रीकृष्ण ग्रुपला आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या कडून ऑक्सीजन कॉन्संट्रेटर प्राप्त झाले.गरजू रूग्णांसाठी हे ऑक्सीजन कॉन्संट्रेटर निशुल्क उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचे लोकार्पण नुकतेच नगराध्यक्षा रत्नमाला भोयर यांच्या हस्ते करण्यात आले.
कोरोनाच्या काळात मूल येथील श्रीकृष्ण ग्रुप आपले सामाजिक दायीत्व निभावत आहे.उपलब्ध असलेल्या विविध लोकोपयोगी वस्तूंच्या माध्यमातून त्यांची रूग्णसेवा सुरू आहे. डेथबॉडी फिझर, अंत्यविधी तिरडी,ऑक्सीजन सिंलेडर,मास्क गरजवंतासाठी निशुल्क उपलब्ध करून देण्यात येतात. ऑक्सीजन कॉन्संट्रेटरची मागणी आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या कडे करण्यात आली होती.ती मागणी तात्काळ मान्य करण्यात आली. ऑक्सीजन बेड रूग्णास वेळेवर उपलब्ध नाही झाल्यास रूग्णास तातडीने ऑक्सीजन कॉन्संट्रेटरच्या माध्यमातून रूग्णाचे जीव वाचविण्यास मदत होणार आहे अशी माहिती आपल्या प्रास्ताविकातून किशोर कापगते यांनी दिली. लोकार्पण सोहळयाप्रसंगी रत्नमाला भोयर यांनी श्रीकृष्ण ग्रुपच्या सामाजीक कार्याबददल कौतूक केले. यावेळी नगर पालिकेचे उपाध्यक्ष नंदू रणदिवे,प्रभाकर भोयर,प्रशांत समर्थ ,बल्लू नागोसे,संजय चिंतावार,राकेश ठाकरे, अक्षय गजापूरे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here