जादुटोणा केल्याच्या कारणावरून वृध्दास जबर मारहाण

0
36

मूल : (प्रतिनिधी) कुटूंबावर जादुटोणा केल्याच्या संशयावरून एका युवकाने पासष्ट वर्षीय व्यक्तीला रस्त्यावर अडवुण गंभीर जखमी केल्याची घटना काल सकाळी घडली.
तालुक्यातील सुशी येथील बेघर वसाहती मध्ये राहणारे ज्ञानेश्वर मेश्राम (६५) सकाळी ७.१५ वा. चे सुमारास सुरेश पेंदाम यांचे दुकानातुन घराकडे परत येत असतांना राकेश भसारकर (३०) याने स्वतः सोबत कुटूंबावर जादुटोणा केल्याचा आड घेवुन ज्ञानेश्वर मेश्राम याला लोखंडी सब्बलीने जबर मारहाण केली. डोका आणि पाठीवर सब्बलीने जबर मारहाण केल्याने ज्ञानेश्वर मेश्राम जागीच बेशुध्द झाले. वडीलाला मारहाण झाल्याने बेशुध्द पडल्याचे समजताच मुलगा अमरेश ज्ञानेश्वर मेश्राम याने मिञाच्या सहकार्याने जखमी वडील ज्ञानेश्वर यांना मूल येथील उप जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ आणले. ज्ञानेश्वर मेश्राम गंभीर असल्याने प्राथमिक उपचारा नंतर जखमीला चंद्रपूर येथील जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान सदर घटनेची तक्रार जखमीचा मुलगा अमरेश मेश्राम याने पोलीसात नोंदविताच सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज गदादे सहका-यांसह घटनास्थळी दाखल होवुन मारहाण करणाऱ्या राकेश भसारकर याला मारण्या करीता वापरलेल्या सब्बलीसह त्याचे घरूनच ताब्यात घेतले. जखमी ज्ञानेश्वर मेश्राम हे जादुटोणा करणारे व्यक्ती असुन त्यांनी आपल्यावर करणी केल्याने डोळे निकामी झाले शिवाय दहा ते बारा वर्षापुर्वी त्यांनी आपल्या सर्व कुटूंबावार करणी केल्याने आपले कुटूंब सतत वेगवेगळ्या रोगाने आजारी पडत असते, त्यामुळे आम्ही ञस्त झाले असुन याला सर्वस्वी झानेश्वर मेश्रामच जबाबदार असल्याने मारहाण केल्याचे राकेश भसारकर यांनी सांगितले. पोलीसांनी आरोपी विरूध्द गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस अधिक्षक अनुज तारे यांचे मार्गदर्शनात ठाणेदार सतिशसिंह राजपुत सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज गदादे यांच्या सहकार्याने करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here